श्री गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा या शाळेत आषाढी एकादशी कार्यक्रम सोहळा उत्स्फुर्तपणे संपन्न
दिवा – ( सचिन शेलवले ) दिनांक 24/07/2026 रोजी शिवदत्त ज्ञानप्रसारक मंडळ संचलित, श्री गणेश विद्या मंदिर दातिवली प्राथमिक विभाग, माय मदर इंग्लीश मिडियम, बाल .जिजाऊ संस्कार केंद्र, लिलावती कला वाणिज्य विद्यालय यांच्या माध्यमातून या शाळेत यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय श्रीमती लिलावती लक्ष्मण म्हात्रे, सचिव श्री साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे ,तसेच सौ . केतकी म्हात्रे मॅडम, सौ . गीता म्हात्रे मॅडम तसेच इतर
पदाधिकारी व प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अनिल भोईर सर तसेच श्री . श्रीराम चौधरी सर, तसेच समस्त शिक्षक वृंद आवर्जुन उपस्थित होते . प्रथमता अध्यक्षांच्या हस्ते विठ्ठलाच्या मुर्तीला पुष्पहार घालून त्यांचे पूजन करण्यात आले . विठठल रखुमाईची पालखी सजविण्यात आली .त्यानंतर प्राथमिक विभागातील तसेच माय मदर इंग्लीश माध्यमाच्या सर्व मुलांनी वारकरी पोशाख परिधान करून विठू नामाचे अभंग पेटी, पखवाज, टाळ, मृदुंगाच्या घोषात तालबद्ध पद्धतीने गायन करून तसेच अभगांवर सुंदर रित्या नृत्य कला सादर करून विठूच्या हरीनामाचा गजर केला . या मध्ये सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली . त्यानंतर विठू रायाची पालखी गणेशनगर ते रुख्मिणी नगर पर्यंत संस्थेचे पदाधिकारी, सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी वारकरी पोशाखात पायी चालत ढोल,पेटी, टाळ, मृदुंग यांचा गजर करत रस्त्यामध्ये फुगड्या, लेझीम तसेच भगव्या पताका, डोक्यावर तुळस घेऊन विठू माऊलीचा गजर करीत दिंडी काढली . त्यामुळे सर्व वातावरण आनंदमय साक्षात पंढरीच्या दर्शनाला पंढरपुरात असल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर ओसांडून वाहत होता . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री .रविंद्र बाळू मोंडुले आणि श्री . सचिन शेलवले सर यांनी केले .त्यानंतर सर्व मुलांना अल्पोहार देण्यात आला .










