Majha Gav Majha Shahr

दृष्टी नसली तरी संकल्प मोठा! टिळक-अण्णाभाऊंच्या स्मृतीदिनी झडपोलीच्या विशेष मुलांनी लावला हरित वारसा.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असा गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि “फकिरा” सारख्या कादंबरीतून समाजाला जागे करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज झडपोलीच्या मातीने अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा, झडपोली येथे टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दृष्टी नसणाऱ्या आणि विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही झाडे लावली.सकाळी 10. 30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या हातून विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे लावण्यात आली.

अंध विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने मातीचा स्पर्श घेत, रोपट्याला पाणी घातले आणि त्याला काठीचा आधार दिला. “आम्हाला झाड दिसत नसेल, पण आम्ही त्याला मोठे करून सावली नक्की घेऊ “अशा भावना एका विद्यार्थ्याने व्यक्त केले.यावेळी महेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून विचार प्रकट करतांना सांगितलं कि “लोकमान्यांनी स्वातंत्र्याची चळवळ उभी केली, अण्णाभाऊंनी शोषितांना आवाज दिला. आज आम्ही त्यांच्या विचारांचा वटवृक्ष रुजवण्यासाठी निसर्ग संवर्धनाचा मार्ग निवडला आहे. आमची मुले जरी विशेष असली तरी त्यांचा संकल्प सामान्य नाही.या”कार्यक्रमाला जितेंद्र वाघ, रामचंद्र भोरे गुरुनाथ चौधरी राम गोविंद, योगेश बोंड, दुर्गा सोनार हे उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याला एका रोपट्याची जबाबदारी देण्यात आली असून, त्याचे संगोपन करण्याची शपथही त्यांच्याकडून घेण्यात आली.

“टिळकांनी आम्हाला देशप्रेम शिकवले, अण्णाभाऊंनी माणुसकी. आज आम्ही त्यात पर्यावरणाची भर घातली आहे. हे वृक्ष उद्या या मुलांसाठी ऑक्सिजनचा आणि प्रेरणेचा स्रोत बनतील,” असे मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर गीत आणि वृक्षसंवर्धनाच्या शपथेने झाली. या उपक्रमामुळे संपूर्ण शाळेचा परिसर हरितमय होण्यास मदत होणार आहे.या वेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें