Majha Gav Majha Shahr

स्वदेश फाउंडेशनच्या पुढाकारातून कळमगावात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोखाडा / सचिन वझरे माझं गाव माझं शहर (वृत्तसेवा)

मोखाडा तालुक्यातील ग्रामपंचायत बेरिस्ते अंतर्गत कळमगाव येथे स्वदेश फाउंडेशनच्या पुढाकारातून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विविध विभागातील अधिकारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमास मा. तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी स्वदेश फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व विषद केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांनीही वृक्षांचे संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारत लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

गाव परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती स्वदेश फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी दिली. कार्यक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें