
श्रमजीवी संघटनेचे मोर्च्याला यश.
माझं गावं माझं शहर वृत्तसेवा.
विक्रमगड प्रतिनिधी प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड* ए. पी. ओ. संपामुळे महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 अंतर्गत चालणारी कामे ठप्प झाल्याने विक्रमगड तालुक्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली असता, त्या अनुषंगाने विक्रमगड तालुक्यातील महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांच्या मार्फत पूर्ववत करण्याचे अनुषंगाने मस्टर काढणे बाबतची कार्यवाही दि. 12/02/2026 रोजी प्रत्यक्ष काम सुरु करण्यात आले आहे. याची दखल घेत श्रमजीवी संघटनेने मोर्चा हा स्थगित केला आहे. या मोर्चेची दखल घेत विक्रमगड तहसीलदार अधिकारी मयूर चव्हाण व विक्रमगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश म. पांढरे यांनी या मोर्च्याची दखल घेत अर्जात स्वाक्षरी देत कामाची हमी देऊन कामाला सुरुवात करण्यास सांगण्यात आले आहे. दिनांक 12/02/2026 रोजी वार गुरुवार पासून असं त्याच्या निवेदन पत्रिका देऊन सांगितलं गेलं. या अनुषंगाने बी डी ओ पांढरे श्रमजीवी संघटना संस्थापक विवेक भाऊ पंडित,राज्य सेक्रेटरी विजय भाऊ जाधव राज्य संघटन सचिव रुपेश भाऊ डोले, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष वसंत पवार, तालुका अध्यक्ष मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली तालुका सचिव किरण पिंगळे, उपाध्यक्ष मगन कोंब,गीता लोहार महिला सचिव पूनम भोये, सक्रिय कार्यकर्ते समीर दुमाडा,धावजी गोंड,रेखा बरफ, लक्ष्मी हाडळ,सभासद यांच्या मेहनतीमुळे आज च्या रोजगार हमी चालु ठेवण्यासाठी यश आले.





