Majha Gav Majha Shahr

बेटेगाव येथे भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न; १७ शाळांचा सहभाग आणि ११२२ जणांची उपस्थिती

बेटगाव येथे भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न;

माझं गाव माझं शहर वृत्तसेवा.

१७ शाळांचा सहभाग आणि ११२२ जणांची उपस्थिती*बोईसर/बेटेगाव: विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन आणि आदित्य बिर्ला कॅपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी २०२६ रोजी बेटेगाव माध्यमिक विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात १७ शाळांतील विद्यार्थ्यांनी आपले ३७ नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प सादर केले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, स्वागत नृत्य आणि पारंपारिक लेझीमच्या तालावर मान्यवरांचे उत्साही स्वागत केले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त DYSP श्री. के. एस. हेगाजे, API श्री. सतीश अस्वार, पोलीस अधिकारी श्री. बाळकृष्ण भोये, आणि बेटेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेश म्हात्रे उपस्थित होते.या प्रदर्शनात एकूण ८१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सौर ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर आधारित ३७ मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर केले. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा (नांदोरे व खुटल), अनुदानित आश्रम शाळा (पडघे) आणि नूतन विद्या मंदिर (उमरोळी) या शाळांतील सुमारे ११२२ विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.प्रदर्शनाचे परीक्षण सौ. प्राची सावंत यांनी केले. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांत विजेत्यांची निवड केली. या यशस्वी आयोजनासाठी श्री. राजेश शेट्टी, श्री. जितेंद्र कांबळी आणि सेवा सहयोगच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मान्यवरांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले आणि विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शनाने या यशस्वी सोहळ्याची सांगता झाली.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें