Majha Gav Majha Shahr

प्रतिनिधी  माझं गावं माझं शहर वृत्तसेवा.दिपक भोये .

विक्रमगड

अक्षय तृतीया निमित्ताने धरतरी ग्रुपतर्फे सलग तिसऱ्या वर्षी देवमोगरा माता दर्शन वारीचे आयोजन; १९ एप्रिल पासून यात्रेला सुरुवात*

 

विक्रमगड:

आदिवासी संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या देवमोगरा माता दर्शनासाठी विक्रमगड मधील खुडेद गावचे आऊज वादक श्री. दिवाळ हरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली धरतरी ग्रुपतर्फे यावर्षीही भव्य दर्शन वारीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, या वारीचे हे तिसरे वर्ष असून, रविवार दिनांक १९ एप्रिल ते मंगळवार २१ एप्रिल २०२६ या कालावधीत ही यात्रा पार पडली . नंदुरबार आणि गुजरात सीमेवरील विविध धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

धरतरी ग्रुपने या वारीचे नियोजन अतिशय पद्धतशीरपणे केले असून, भाविकांना तीन दिवसांत महत्त्वाच्या शक्तिपीठांचे आणि देवस्थानांचे दर्शन घेता आले :

*पहिला दिवस (रविवार, १९/०४/२०२६):* वारीची सुरुवात आदिशक्ती सप्तश्रुंगी माता दर्शनाने झाली . त्यानंतर भाविकांनी मोठादेव,शबरीमाता आणि कनसऱ्यादेव या स्थानांचे दर्शन घेतले .

*दुसरा दिवस (सोमवार, २०/०४/२०२६)*: नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा येथील देवमोगरा माता दर्शन आणि त्यानंतर गुजरात राज्यातील निसर्गरम्य नालाकुंडा परिसर दर्शन झाले .

*तिसरा दिवस (मंगळवार, २१/०४/२०२६):* वारीच्या समारोपप्रसंगी गुजरात राज्यातील मुख्य देवमोगरा माता मंदिरात दर्शन व विस्तीर्ण परिसराचे करून यात्रेची सांगता झाली .

*श्रद्धेचा आणि संस्कृतीचा संगम*

> “पालघर मधील धरतरी ग्रुप हा अक्षय तृतीया निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून ही परंपरा जोपासत आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि आपल्या लोकसंस्कृतीच्या संवर्धनासाठी खुडेद मधून दरवर्षी देवमोगरा मातेच्या वारीचे आयोजन करण्यात येते,” असे आयोजकांतर्फे संदीप पाटारा यांनी सांगितले.

>

नंदुरबार आणि गुजरात परिसरातील या देवस्थानांना आदिवासी बांधवांमध्ये मोठे महत्त्व आहे. या दर्शन वारीमुळे भाविकांना एकाच वेळी सर्व महत्त्वाच्या देवांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली. या वारीत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले .

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें