
जीवनावश्यक सोयी सुविधांसाठी आदिवासी पाड्यांचा संघर्ष; विक्रमगड तहसिल कार्यालयात धरणे आंदोलन..
. प्रतिनिधि. प्रशांत दाव्हाड
जीवनावश्यक सोयी सुविधांसाठी आदिवासी पाड्यांचा संघर्ष; विक्रमगड तहसिल कार्यालयात धरणे आंदोलन.. विक्रमगड. प्रतिनिधि. जीवनावश्यक सोयी सुविधांसाठी आदिवासी पाड्यांचा संघर्ष; विक्रमगड तहसिल कार्यालयात धरणे आंदोलन .विक्रमगड तालुक्यातील गाव खेडयातील आदिवासींच्या विकासाचा समतोल ढासळलेला असुन शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी पाणी, वीज,बेसुमार वीज बील, रोजगार, निवारा शिक्षण रस्ते, इमारत बांधकाम योंजनेचा बोजवारा वन जमिन, जलजिवन मिशन योजना, थकित मजुरी अशा विविध मुलभुत सुविधा अभावी समस्यांनी ग्रासले आहेत. या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज विक्रमगड तहसिल कार्यालयात तालुका श्रमजीवी सघटनेने मार्चा आणुन हिशोब धरणे आंदोलन केले. याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना निवदेन देण्यात आले होते. त्यानुसार आज सदरील मोर्चामध्ये घेतलेल्या विविध विषयांवर तहसिलदार, गट विकास अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी, रोहयोचे अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी याचे समवेत चर्चा करण्यात आली. विक्रमगड तालुक्याच्या निर्मीतीस २६ वर्षांचा काळ लोटलेला आहे. तरीही आदिवासी गाव पाडयातील नागरीक विविध सुविधांपासुन वंचित आहेत. आजही गाव, पाडयात वीज नसल्यामुळे देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे होवून देखील येथील ग्रामस्थांना आजही अंधारातच जीवन जगावे लागत आहे. आजही येथील आदिवासी समाज मुलभुत सुविधांची मागणी करीत आहेत. या पाश्वभूमीवर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या मोर्चाचे नेतृत्व श्रमजिवीचे पदाधिकारी मंगेष काळे, कैलास तुंबडा, रुपेश डोले आदींनी केले.निवेदनात केलेल्या मागण्या :
१.जलजिवन मिशन योजनेअंतर्गत कामे अपूर्ण बांधकाम व निकृष्ट दार्जाचे असुन ठेकेदार व अधिकारी यांनी तात्काळ ७९ कामे करणे
२.तालुक्यातील रोजगार हमीची कामे सुरु असुन रखलेली मजुरांची मजुरी त्यांचे बॅक खात्यावर जमा करण्यांत यावी व ज्या भागात कामे सुरु नाहीत तेथे कामे सुरु करावीत.
३.इमारत बांधकाम योजनेचे अर्ज भरले असुन त्या लाभार्थ्यांना सर्व योजना अदयाप मिळालेल्या नाहीत(बांधकाम साहित्य व इतर )यापासुन वंचित असुन या योजनेची सखोल चौकशी व कारवाई व्हावी.
४.तालुक्यातील कासपाडा, टाकरेपाडा ते खोमारपाडा, पलाटपाडा, आपटीखु, काकडपाडा, मोहोबु, गोंडपाडा, तांबडमाळ, म्हसेपाडा, तरेपाडा, चिंचघर अशा विविध गाव पाडयात लाईटपासुन वंचित असलेल्या ग्राहकांना विजेची व्यवस्था व्हावी.
५. जनमन योजनेपासुन कातकरी कुंटुबे वंचित राहिली आहेत व घरकुलाचे हप्ते थांबविले आहेत ते तात्काळ वाटप करावे.
६.जन्म दाखल्यांकरीता प्रकरण दाखल केली आहेत अशा लाभार्थ्यांना त्वरीत जन्म दाखले वाटप करावेत.आहे तसा प्रस्थाव नगरपंचायकडे तयार आल्याचेही समजते.






